बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळूंगे येथे महाराष्ट्र बंद पाळला जाणार.

0

बाणेर :

बाणेर बालेवाडी पाषाण येथील विविध व्यापारी कष्टकरी संघटनांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत 11 ऑक्टोबर सोमवार च्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

नुकतेच उत्तर प्रदेशामध्ये केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात मोर्चाने निघालेल्या शेतकरी बांधवांचा अपघात होऊन त्यांना मरण पत्करावे लागले आहे. सदर घडलेल्या वाईट घटनेचा महाविकास आघाडी निषेध करत आहे. लखीमपुर खीरी येथे अंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून आठ जणांना मृत्यूमुखी पाडण्यात आल त्या केंद्रीय गृह राज्यमंत्री पुत्राला पाठिशी घालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ११ तारखेला सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र बंद ची प्रभाग क्रमांक ९ मध्ये माहिती देताना शिवसेना उप शहर प्रमुख राजेन्द्र धनकुडे यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांना पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे, पाषाण या परीसरात पाळला जाणार आहे. सर्व व्यापारी संघटनांनी देखील बंद ला पाठींबा दिला आहे.

See also  बाणेर येथे शिवसेनेच्या वतीने ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती मुळे विकास कामांचा अहवाल प्रकाशित !