पाषाण येथे ‘वननेस वन’ परियोजनेअंतर्गत ६४५ वृक्षांची लागवड

0

पाषाण :

०२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीचे औचित्य साधून “शहरी वृक्ष समूह“ योजनेअंतर्गत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून पंचवटी, पाषाण येथे ६४५ वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व वृक्षांना पाणी पुरवठ्यासाठी ठिबक सिंचन देखील करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत मिशनच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचे काम सतत चालू राहील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

यावेळी बोलताना स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांनी संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात घेऊन वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रम राबविण्या करिता लागेल ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, गुरुस्वामी तुम्माले (स. उद्यान अधीक्षक), अध्यक्ष संदीप काळे(वृक्ष प्राधिकरण समिती) राहुल कोकाटे, अशोक दळवी, प्रदीप हुमे, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

पुणे झोनचे झोनल इंचार्ज ताराचंद करमचंदानी यांनी मिशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. किशनलाल अडवाणी क्षेत्रीय संचालक पिंपरी क्षेत्र आणि पोपट तावरे क्षेत्रीय संचालक पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षांची लागवड करण्यात आली. मिशनचे पाषाण सुतारवाडी ब्रँचचे प्रबंधक बिकबहादूर बोगाटी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

 

See also  बाणेर पाषाण लिंक रोड वरील लसीकरण केंद्र नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नातून सुरू.....