सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत..

0

सोमेश्वरवाडी :

४ ऑक्टोबर २०२१ रोजी पासुन कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या शाळा अखेर सुरू झाल्या आहे. सोमेश्वरवाडी येथील वसंतदादा पाटील विद्यालय येथे शाळेच्या प्रथम दीना निमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांनचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य व खाऊ वाटप करून सचिन दळवी आणि मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी सचिन दळवी यांनी सांगितले की, खूप मोठ्या कालखंडानंतर कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. आज पहिल्याच दिवशी मुलांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये शाळेमध्ये प्रवेश केला. कोरोना चे सर्व नियम पाळून शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. मुलांचा शाळेमध्ये येण्याचा उत्सव वाढावा म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित सचिन दळवी, विनय निम्हण, शिवम दळवी, अमोल जोरे, स्वप्निल आरगडे व गोकुळ जाधव तसेच शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित आदि उपस्थित होते.

 

See also  अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलनाचा बाणेर बालेवाडी इथे शुभारंभ.