वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीनं वंचित कुटुंबातील मुलींना ड्रेस मटेरियल स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांच्या पुढाकाराने वाटप…!

0

पाषाण :

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गोर गरीब कुटुंबातील लेकिंसाठी सणासुदीच्या काळात वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीनं लमाणतांडा ,संजय गांधी वसाहत पाषाण येथे समाजातील वंचित कुटुंबातील मुलींना ड्रेस मटेरियल (शिलाईसह) दिले गेले.

कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी, वात्सल्य फाऊंडेशनच्या वतीनं खजिनदार प्रकाश बालवडकर, अनुराधा एडके, राज तांबोळी, राजेंद्र येडे, चंद्रकात पवार यांच्या सहकार्याने स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर आणि कोथरुड भाजपा उपाध्यक्ष उत्तम जाधव यांनी केले होते.

याची माहिती मॅकन्यूज ला देताना स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांनी सांगितले की, प्रभागांमध्ये असणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील मुलींसाठी आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावे या हेतूने तसेच सेवा हेच संघटन या मार्गदर्शक तत्त्वाचा अवलंब करून या गरीब मुलींसाठी वात्सल्य फाउंडेशन च्या माध्यमातून शिलाई सह ड्रेस मटेरियल उपलब्ध करून देत आहोत. ड्रेस शिवून आठ दिवसात ड्रेस उपलब्ध करून दिले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ सुतार, प्रभाग समिती अध्यक्षा स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, भाजपा नेते राहुल कोकाटे, उत्तम जाधव, प्रविण आमले, राजेंद्र पाषाणकर, रोहन कोकाटे, सचिन दळवी, विकास पाटील, आकाश पवार, समीर ववले, विनायक कोकाटे, निरज जेजुरकर, त्याच प्रमाणे सेवालाल मंडळाचे अध्यक्ष लहू खेतावत, दत्ता खेतावत, रामभाऊ चेमटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पाषाण येथे क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.