पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत सत्ताधारी भाजपची माघार

0

पुणे :

पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपने माघार घेतली. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तिव्र विरोध केल्यानंतर बुधवारी मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय आता भाजपने घेतला आहे.

याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भाजपची भुमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर म्हणाले, या सर्व अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देऊन त्यामाध्यमातून जवळपास 1 हजार 700 कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. या निधीतून अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागू शकणार आहे. मात्र, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी जाणीवपुर्वक अ‍ॅमेनिटी स्पेस विकायला काढल्या आहेत असे आरोप करून पुणेकरांमध्ये गैरसमज निर्माण केला.

एकीकडे एमएमआरडीए, पीएमआरडीए, सिडको याठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताब्यामधील संस्थामध्ये अशा पध्दतीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मात्र भाजपची सत्ता असल्याने चुकीचे आरोप करून गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. बुधवारी मुख्यसभेत यासंबधीचा प्रस्ताव मंजुर करणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केले. तसेच अ‍ॅमेनिटी भाडे तत्वावर देण्यास आम्ही ठाम असल्याचेही महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले.

See also  आपल्या क्षेञात पायोनियर व्हा : प्रा.शामकांत देशमुख