प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा वापर करावा : चंद्रकांत पाटील

0

बालेवाडी:

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार महेश लांडगे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मयुरी प्रणव बालवडकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून प्रकाश बालवडकर नागरिकांची सेवा करत भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करत आहेत. येथून पुढे ही नागरिकांच्या अडीअडचणी प्रसंगी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही बांधील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेल्या सेव हेच संघटन या तत्त्वाचा अवलंब करून प्रकाश बालवडकर आणि मयुरी प्रणव बालवडकर यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याकरता जनसंपर्क कार्यालय उभे केले. नागरिकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्ध केली आहे. त्यांनी आज पर्यंत चांगल्या पद्धतीने नागरिकांची सेवा केली आहे. ती अशीच पुढे चालू राहील अशी खात्री यावेळी त्यांनी व्यक्त केली.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देताना सांगितले की, या जनसंपर्क कार्यालयांमध्ये नागरिकांची सेवा घडो. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम प्रकाश बालवडकर यांच्या माध्यमातून घडेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘राष्ट्र प्रथम’ ही पक्षाची शिकवण असल्यामुळे ‘जनसेवा हेच पक्षकार्य’ हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे ब्रीद असते. त्यामुळे सामाजिक जीवनात मिळणारे प्रत्येक पद, प्रत्येक संधी केवळ जनतेच्या सेवेसाठीच खर्ची घालतोय. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधणे शक्य होणार आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे, औंध प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, शिवम बालवडकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेवक सागर गवळी, राहुल कोकाटे, प्रशांत हरसुले, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, पांडुरंग धावडे, नीलेश निम्हण, गोरख दगडे, काळुराम गायकवाड, अनुराधा एडके, राज तांबोळी, जगन्नाथ धनकुडे, व्यापारी संघटनेचे किरण तापकीर, प्रकाश तापकीर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

See also  बालेवाडीतील अनाधिकृत बांधकामे पाडली पालिका अधिकारी म्हणाले...