कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या पठ्ठयाला.. 

0

सातारा प्रतिनिधी :-

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या पठ्ठयाला झाला आहे. प्रेम प्रकरणातून त्यांना कश्मीर चे जावई बनता आले आहे. कराडचे अजित पाटील आता काश्मीरचे जावई झाले आहेत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या पाटलांनी काश्मीरच्या सुमन देवीसोबत विवाह केला. आधी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने, तर नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली.

अजित प्रल्हाद पाटील हा कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे तो प्रशिक्षण देतो. सध्या तो झाशीत कार्यरत आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगतशी त्याची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांकडून प्रेमाचे अंकुर फुलले.

नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते.कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि तब्बल तीन महिने सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावे लागले. याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले. या नात्याचे रुपांतर त्यांनी 27 नोव्हेंबर 2020 रोजी लग्न गाठ बांधून पूर्ण केले.

See also  रेमडेसिवीर सारखे औषध भाजपवाले कसे खरेदी करु शकतात? : जयंत पाटील