मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष : भाई जगताप

0
slider_4552

मुंबई :-

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

मुंबई प्रदेश समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड करण्यात येत असल्याचे आज पक्षाकडून जाहीर करण्यात आले. काँग्रेस अध्यक्षा यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काँग्रेसने मराठा नेते भाई जगताप यांना मुंबईत पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी , यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.

भाई जगताप यांच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे.

See also  हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे