टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पदकांचा वर्षाव.

0

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पदकांचा वर्षाव.

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंवर आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) अगदी पदकांचा वर्षाव होत आहे. दिवसाच्या सुरुवातीला टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) रौप्य पदक जिंकल.

त्यानंतर काही वेळापूर्वीच उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं. निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. तर आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात (Men’s discus throw F52) भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले आहे.

41 वर्षीय विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे यश मिळवलं आहे. विनोदच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विनोदने देखील निशादप्रमाणे आशिया खंडातील एक नवं पॅरा एथलिट्सच रेकॉर्ड या थ्रोने प्रस्थापित केलं आहे. विनोद कुमारने सहा प्रयत्नांमध्ये हे यश मिळवलं. यातील पहिल्या प्रयत्नात त्याने 17.46 मीटर दूर थाळी फेकली. ज्यानंतर 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर, 19.81 मीटर असे थ्रो केले. यामध्ये पाचवा थ्रो हा त्याचा सर्वात लांब अर्थात 19.91 मीटरचा होता. ज्यासाठी त्याला कांस्य पदक देण्यात आलं.

निशाद आणि भाविनाची चंदेरी कामगिरी

महिला पॅडलर भाविना पटेलला टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. मात्र अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतल्याने तिला रौप्य पदक मिळालं. तर उंच उडीपटू निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे त्याने एक नवं जागतिक रेकॉर्डही सेट केले. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचाच विसे डलास राहिला. त्याने कांस्य पदक पटकावलं.

See also  पाषाण येथे आमदार निधीतून उभारले बस थांबे.