खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ती मदत केंद्र सरकार पुरवण्यासाठी बांधील : राजनाथ सिंह

0

पुणे :

देशामध्ये खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ती मदत केंद्र सरकार पुरवण्यासाठी बांधील आहे. आणि देशातील प्रत्येक खेळाडूला याविषयी माहिती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुणे येथे केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुणे येथे लष्कराच्या क्रीडा संस्थेस भेट दिली त्यावेळी ऑलम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोळा खेळाडूंचा गौरव करण्यात आला. लष्कराच्या या क्रीडा मैदानाचे नीरज चोप्रा स्टेडियम असे नामकरणही करण्यात आले.

भारताने देशात खेळ वाढण्यासाठी कधीच व कोणतीच तडजोड केली नाही आणि करणारही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः क्रीडाप्रेमी असून ते खेळाला प्रोत्साहन देण्यात ही सर्वांच्या पुढे असतात असेही म्हणाले.

देशातील राज्य सरकारी खेळावर घेत असलेल्या मेहनतीचे कौतुकही राजनाथ सिंह यांनी केले. सांघिक आणि वैयक्तिक खेळाला प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे. व राज्य सरकारही याबाबतीत मागे नाही असे राजनाथ सिंह म्हणाले.

पुणे येथे झालेल्या या गौरव सोहळ्यात तरुणदीप राय, प्रवीण जाधव (तिरंदाज), अमित कुमार, मनिष कौशिक, सतीश कुमार(बॉक्सिंग), सी के कुटप्पा, छोटेलाल यादव (बॉक्सिंग प्रशिक्षक), दीपक पूनिया (कुस्ती), अरुणलाल जाट, अरविंद सिंग (रोइंग), विष्णू सर्वानन (सेलिंग) व निरज चोप्रा या खेळाडूंचा गौरव करण्यात आला यावेळी नीरजला भाल्याची प्रतिकृती भेट देण्यात आली या कार्यक्रमामध्ये लष्कर प्रमुख एम नरवणे सुद्धा उपस्थित होते.

See also  लसीबाबत जागतिक निविदा (टेंडर) काढूनही लस मिळण्याची शक्यता कमी : आयुक्त राजेश पाटील