आयुष्यमान भारत विमा योजना नोंदणीस चांगला प्रतिसाद : सचिन दळवी

0

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी 2018 साली ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना हे महत्वपूर्ण पाऊल टाकले. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

भारतीय जनता पार्टीचे सचिन चिंतामण दळवी यांच्या माध्यमातून सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुसरोड, लमाण तांडा, पंचवटी परिसरातील नागरिकांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ कोथरुड मतदारसंघाचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी यांच्या हस्ते आज शनिवार दि. २१ /८ /२०२१ रोजी सोमेश्वरवाडी येथे झाला. परिसरातील नागरिकांनी आरोग्य विमा प्राप्त करून घेण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे.

या कार्यक्रमाची माहिती मॅकन्यूजला देताना सचिन दळवी यांनी सांगितले की, कोरोनामुळे आरोग्याचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे, आरोग्य बाबतीत आलेल्या समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य विमा प्रधान करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती मदत केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी २३ / ८ / २०२१ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान दळवी यांनी यावेळी केले.

यावेळी पोपटराव जाधव, खंडूशेठ आरगडे, शामराव काकडे, भाजपा नेते राहुल कोकाटे, लहु बालवडकर, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, नवनाथ ववले, प्रविण आमले, मोरेश्वर बालवडकर, दत्तोबा खुळे, बंळवत निम्हण, धनंजय बामगुडे, बाळासाहेब येवले, दिपक जाधव, संतोष सपकाळ, सुनिल खुळे, रविंद्र जोरे, विनायक काकडे, संजय निम्हण, गणेश पठारे, नामदेव आरगडे आणि भाजपा कार्यकर्ते तसेच सचिन दळवी मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

 

See also  अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिर