“तू माझा सांगाती” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा सरला चांदेरे यांच्या हस्ते संपन्न.

0

बाणेर :

ज्ञानमुद्रा पब्लिकेशन प्रस्तुत प्रसिद्ध कवियत्री वैशाली कलमानी यांच्या “तू माझा सांगाती” या कवितासंग्रहाचा पुस्तक प्रकाशन सोहळा गुरुवार दि . १२ ऑगस्ट रोजी बाणेर येथील कै. हिराबाई मारुतराव धनकुडे महिला बहु उद्देशीय भवन येथे सरला बाबुराव चांदेरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. “तू माझा सांगाती” हा काव्यसंग्रह विविधांगी व सकारात्मक विचाराचा असून माणसांना जीवनात प्रेरणा देणारी ही आहे. अत्यंत सहज आणि सुलभतेने या पुस्तकात काव्यरचना उमललेली आहे. उपस्थित मान्यवर आणि सर्व रसिकांनी या काव्यरचनेचे भरभरून कौतुक केले

कवियत्री वैशाली कलमानी यांनी यापूर्वी ” हे बंध रेशमाचे ( फक्त तुझ्यासाठी ) ” या कविता संग्रहाचे पुस्तक प्रकाशित केले होते आणि या पुस्तकाला कवी रसिकांनी प्रचंड उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला होता त्याच प्रमाणे वैशाली कलमानी यांनी अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये सहभागी होऊन अनेक सन्मानपत्र पटकाविले आहेत .

या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रसिद्ध लेखिका सौ. पूजा सामंत, ज्ञानमुद्रा पब्लिकेशनच्या संचालिका डॉ.माधुरी वर्तुले व शितल देशमुख, कवी – सतीश गोरे , नितिन कळमकर , माणिक गांधिले, विशाल विधाते, शेखर सायकर, पुनमताई विधाते, सुषमाताई ताम्हाणे, राखीताई श्रीराव, माधुरी इंगळे, रोहिनीताई सुतार, प्राजक्ता ताम्हाणे हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी डॉ. सतीश पाडोळकर यांनी केले.

See also  पाषाण येथे अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी झालेल्या मोफत लसीकरण मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद.