पाषाण येथे अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी झालेल्या मोफत लसीकरण मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

पाषाण :

संपूर्ण जगाची कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोना रोखण्याकरिता सध्या तरी लसीकरणा शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. परंतु हे लसिकरण करून घेणे अल्प उत्पन्न धारक नागरिकांना शक्य होत नाही. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षीत राहावे यासाठी त्यांच्या आवाक्याबाहेर असणारे लसीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, लोकविकास मंडळ, सिरम इन्स्टिट्यूट व शिवराय मित्र मंडळ विश्वकर्मा मित्र मंडळ अध्यक्ष अमित रणपिसे व संजय निम्हण यांनी संयुक्तपणे सामाजिक बांधिलकी जपत श्री विठ्ठल मंदिर, सुतारवाडी, पाषाण येथे अल्पउत्पन्न गटातील लोकांसाठी “मोफत लसीकरण मोहिम” राबवून करत आहे.

दोन दिवसात अल्पउत्पन्न गटातील लोकांसाठी मोफत लसीकरण झाले, पहिल्या दिवशी ३७७ व दुसऱ्या दिवशी ४३८ अल्पउत्पन्न गटातील लोकांचे विक्रमी लसीकरण झाले.

सदर लाशीकरण यशस्वी करण्यात संघाचे पदाधिकारी, राजाभाऊ सुतार, दत्ता सुतार, खेमराज रणपिसे, महेंद्र रणपिसे, मानकर काका, शरद रणपिसे, हभप दिलीपभाऊ रणपिसे, मधुकर रणपिसे, आशिष रणपिसे, कैलास रणपिसे, प्रमोद रणपिसे, मुकुंद रणपिसे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकाऱ्यांनी मित्रपरिवाराने अतिशय उत्तम व्यवस्था करून शिबीर यशस्वी केले.

See also  पीएमपीएलच्या ऑइल गळतीमुळे बालाजी चौक सुस रोड येथे दुचाकी घसरून अपघात.