पुणे शहर भाजप च्या युवा मोर्चा च्या युवा वॉरियर्स या नविन विभागाची कार्यकारिणी जाहीर.

0

पुणे :

पुणे शहर भाजप च्या युवा मोर्चा च्या युवा वॉरियर्स या नवीन विभागाची कार्यकारणी नियुक्ती जाहीर झाली. सदर कार्यकारणी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते व भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या नेतृत्वाखाली जाहिर करण्यात आली.

सदर प्रसंगी भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, शहर प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा युवा वॉरियर्स चे शहर अध्यक्ष शिवम बालवडकर व प्रतीक गुजराथी यांनी केले होते, प्रसंगी महाराष्ट्रातील सर्वात प्रथम या विभागाची नियुक्ती करण्याचा मान पुणे शहर भाजप युवा मोर्चा युवा वॉरियर्स ला मिळाला त्याचे कौतुक करण्यात आले.

शहरातील प्रत्येक १८ ते २५ वयोगटातील युवा व विद्यार्थी वर्गाच्या हक्कासाठी व त्यांना योग्य दिशा देण्यासाठी संघटनेतील ह्या विभागाच्या नियुक्त्या केल्या आहेत. भविष्यातील या सर्व जबाबदारीसाठी सर्व प्रमुखांच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना शुभेच्या देण्यात आल्या.

See also  पुणे महापालिकेने घेतला ट्रॅफिक प्लॅनर नेमण्याचा निर्णय