कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत १ टक्का आरक्षण

0

मुंबई :

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत १ टक्का आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या आणि एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राज्यात राबविणार असल्याचेही यावेळी यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

कोरोना माहामारी आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. कोरोना निर्बंधांबाबत आणखी शिथिलता आणि पूरग्रस्तांसाठी मदत यांसाऱख्या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.

त्याचबरोबर, गेल्या आठवड्यात हॉटेल चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्याची मागणी केली होती. यावर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

• नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत
• भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव राज्यात १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करणार
• अमरावती जिल्ह्यातील राजूरा लघु पाटबंधारे प्रकल्पास १९३.८१ कोटींची सुधारीत मान्यता.
• अनाथांना एक टक्का आरक्षण लागू करणार.
• नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारीत योजना राज्यात राबविणार.

See also  अण्णा आंदोलनावर ठाम : फडणवीसांची चर्चा निष्फळ