बैलगाडी शर्यत सुरु करावी यासाठी वडगांव तहसील कार्यालय येथे आंदोलन

0

मावळ :

महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी चालू व्हावी यासाठी वडगाव मावळ येथे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी, बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एकेकाळी महत्वाचा खेळ मानला जात होता. या खेळाशी ग्रामीण भागातील लाखो तरुणांचे भावनिक नाते आहे.

ग्रामीण भागात यात्रोत्सवात भरविण्यात येणार्‍या बैलगाडी शर्यतींच्या निमित्ताने होणारी अर्थिक उलाढाल ही मोठी आहे.

या बाबींचा विचार करुन बैलगाडी शर्यत सुरु करावी यासाठी वडगांव तहसील कार्यालयावर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेत. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने व्यापारी वर्ग, वाहतूक व्यावसायिक, छोटे व्यावसायिक, बैलगाडी व्यवसायिक यांची नाळ या व्यावसायाशी जोडली गेली आहे.

बैलगाडी शर्यती बंदीचा निर्णय झाल्यापासून या खेळाशी निगडीत सर्व व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत, ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि येथील अर्थकारणाला चालना मिळण्यासाठी शर्यती सुरु करणे हाच एकमेव पर्याय आहे. राज्यशासनाने अध्यादेश काढून बंदी घातलेल्या बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा सुरु कराव्यात, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात असे भेगडे म्हणाले. या आंदोलनात मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शेतकरी आणि शर्यतप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

See also  कोरेगाव भीमा परिसरात जमाव बंदी !