सुस, म्हाळुंगे समाविष्ट गावांना दररोज दोन लक्ष लिटर पाणीपुरवठा टँकरने करणार : नगरसेवक अमोल बालवडकर

0

सुस/म्हाळुंगे :

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणुन, पुणे मनपा मध्ये नव्याने समाविष्ट सुस व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये रोज २ लक्ष लिटर म्हणजे, रोज २० टँकर पिण्याचे कॉर्पोरेशनचे पाणी पुरवठा करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.

नगरसेवक अमोल बालवडकर यांना पक्षाच्या वतीने सुस गावाची जबाबदारी दिल्यानंतर प्रथमता येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सुस/म्हाळुंगे येथील नागरिकांना महानगरपालिकेचे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तो त्रास पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना कमी व्हावा म्हणून सध्या तरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अमोल बालवडकर यांनी घेतला आहे.

या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ , पुणे भाजपा अध्यक्ष जगदीशजी मुळीक, पुणे भाजपा संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्या शुभहस्ते व सुस, म्हाळुंगे आजी माजी सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दि २२ जुलै रोज़ी संपन्न होणार आहे. म्हाळुंगे येथे सकाळी ११ : ०० वा. सांस्कृतिक सभागृह जिल्हा परिषद शाळा तर सुस गावामध्ये सायंकाळी ५ : ०० वाजता भैरवनाथ मंदिर सुस गाव येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

See also  रतन टाटा यांना व्यवसाय आयडॉल मानणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी, सूसगाव येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट मध्ये शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या दिल्या सूचना.