पुणे :
पुणे जिल्हा हा सांप्रदायिक क्षेत्रातील फार मोठा वारसा असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून सर्वांना घरी बसावे लागले, काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपला सांप्रदायिक वारसा जोपासण्यास बंधने गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अवघ्या महाराष्ट्राला विठू माऊलींचे पायी वारी करता आली नाही.
हरिनामाच्या गजरात भजन कीर्तनाचा नाद घुमत सुरू असणारे पंढरपूरची वारी न झाल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली आहे. ही निराशा दूर करण्याच्या हेतूने ज्यांनी आपले आयुष्य सांप्रदायिक, सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय या क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले असे पुण्यातील शिवाजीनगरचे माजी आमदार व प्रसिद्ध उद्योजक विनायक निम्हण यांच्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त साधून सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुणे शहरात विठू माऊलींच्या भक्तांसाठी “भक्ती रंग” ही भजन स्पर्धा आयोजित करून सांप्रदायिक क्षेत्रातील भजन कीर्तन साठी ऑनलाईन मानाचे व्यासपीठ सनी निम्हण यांनी उपलब्ध करून दिले आहे.
या स्पर्धेविषयी माहिती देताना सोमेश्वर फाऊंडेशनचे विश्वस्त माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, शिवाजीनगरचे कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त “भक्तीरंग” ही भजन स्पर्धा पुणे शहरातील नागरिकांसाठी २३ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा होईल, ५ ऑगस्ट ला समस्त निम्हण विठ्ठल मंदिर, पाषाण, येथे अंतिम ऑफलाईन फेरी होईल, अशाप्रकारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीला जाण्याचा योग पुणेकरांना आला नाही. म्हणूनच ‘ठायीच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ असा दिव्य अनुभव आणि आनंद घ्या. या स्पर्धेत आनंदाने सहभागी व्हा! असे आव्हान सनी निम्हण यांनी केले आहे.
पुढे माहिती सांगताना निम्हण म्हणाले की, स्पर्धेच्या निमित्ताने सांप्रदायिक क्षेत्रातील भक्तांमध्ये नव चैतन्य निर्माण व्हावे, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सध्या ऑनलाईनच जग असल्याने सांप्रदायिकता सुद्धा ऑनलाइन व्यासपीठावरती मागे नाही हेच या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्ध होणार आहे.