उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कबड्डी स्पर्धा कोरोना मुळे स्थगित

0

बाणेर :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष विभाग जिल्हा संघ व महिला विभाग सांघिक संघ कबड्डी स्पर्धेचे दिनांक २२ ते २५ जुलै २०२१ या कालावधित श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुगे – बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. राज्यशासनाच्या कॅबिनेट मिटींगमध्ये कोरोना मुळे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नियमानुसार प्रत्येक खेळाडुने कोरोना प्रतिबंधक दोन डोस घेणे बंधनकारक आहे परंतु वय वर्षे १८ ते ४४ या वयोगटातील खेळाडूंनी एकच लस घेतलेली आहे दुसरा डोस ८४ दिवसांनी मिळणार आहे त्यामुळे सर्व खेळाडुंचे दोन्ही डोस पुर्ण झालेले नाही.

आज बाणेर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संयोजन समितीच्या सदस्यांनी प्रत्येक्षात भेट घेऊन सदर स्पर्धेबाबत चर्चा केली त्या प्रसंगी अजितदादा यांनी सांगितले की, शासनाच्या सर्व नियमांस अधिन राहुन स्पर्धेचे आयोजन करण्यास हरकत नाही. परंतु अजून तरी राज्यशासनाने नियम शिथिल केलेले नाहीत. सदर स्पर्धा स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या नावाने शासनाचे निर्बंध शिथिल झाल्या नंतर ताबडतोब आयोजित करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

म्हणून संयोजन समितीने तातडीने निर्णय घेवून दि. २२ ते २५ जुलै २०२१ या दरम्यान होणारी तात्पुर्ती स्पर्धा स्थगित केली असून स्पर्धेची पुढील तारीख लवकरच सर्वांना कळविण्यात येईल असे मॅकन्यूज शी बोलताना संयोजन समितीने सांगितले.

See also  आकाश कंदील बनवण्याच्या कार्यशाळेचे माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्याकडून आयोजन...