बाणेर येथील दुसऱ्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहाणी

0

पुणे:

बाणेर येथे उभारण्यात आलेल्या सर्वे न.३३ येथील नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज भेट देऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पीटलमध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचा तसेच साधन सामुग्रीचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता, आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

हॉस्पीटलची ठळक वैशिष्ट्ये

एकूण बेड क्षमता-209

ऑक्सीजन बेड-147

आयसीयु बेड-62

ऑक्सीजनसाठी दोन प्रकल्पाची उभारणी

तसेच यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाणेर बालेवाडीच्या पाणी प्रश्न संदर्भात आढावा घेतला. त्यामध्ये नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी वारजे ते बालेवाडी पर्यंत 900 ची एक्सप्रेस पाण्याची लाईन टाकण्या संदर्भात निवेदन दिले होते व ते काम लवकरात लवकर संपून बाणेर बालेवाडी चा पाणी प्रश्न मिटवा असे आदेश माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच मुळशी धरणातून पुणे महानगरपालिकेला भविष्यात होणाऱ्या पाणीपुरवठा संदर्भात समिती स्थापन झालेली आहे व ती समिती लवकरात लवकर अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करणार आहे असे पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच मुळशी धरणातून लवकरात लवकर पाणी आणून सुस – म्हाळुंगे आणि बाणेर- बालेवाडी या भागाचा पाणी प्रश्न मिटवण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी या प्रकल्पासाठी लागणाऱ्या नियोजित जागेची पाहणी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यावेळी दिली.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सुषमा निम्हण, डॉ.सागर बालवडकर, चंद्रशेखर जगताप, जंगल रणवरे, नितीन कळमकर, समिर चांदेरे, विशाल विधाते, मनोज बालवडकर, सुषमाताई ताम्हाणे, पुनमताई विधाते, राखीताई श्रीराव, प्राजक्ता ताम्हाणे तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यांच्यासह सबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

See also  डॉ सागर बालवडकर यांच्या प्रयत्नांना यश , बालेवाडी मधील सोसायट्यांना मिळणार पाईप द्वारे गॅस.