पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः मैदानात

0

पुणे :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी अनेक पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड आणि मनमोकळेपणाने उत्तरं देत, महाविकास आघाडी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि काही सवाल उपस्थित केले.

तर मग ओबीसी आणि मराठा आरक्षण अडलंय कुठे?

“केंद्र आणि राज्य सरकार दोघेही हा प्रश्न सोडवायला तयार आहेत, तर मग ओबीसी आणि मराठा आरक्षण अडलंय कुठे? फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का?

या दोन्ही मुद्द्यांवर कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी सगळ्यांना व्यासपीठावर आणून समोरासमोर चर्चा केली पाहिजे,” असं ते म्हणाले.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. यावेळी मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. आज त्यांनी, “निवडणुकांच्या तयारीसाठी आलो आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, यावर परिस्थिती पाहून निर्णय घेणार,” असं सांगत, “निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?,” असा सवाल केला आहे.

ईडीने तर कारवाई सुरु केली, खडसेंच्या सीडीची वाट पाहटतोय.

“सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही आणि भाजपचं सरकार आल्यानंतर ते देखील वापर करत आहेत. या यंत्रणा तुमच्या हातातल्या बाहुल्या नाहीत, जिचा वापर नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा असतो,” असं म्हणत, “एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय,” असा टोला त्यांनी खडसेंना ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लगावला आहे.

नारायण राणेंना फोन केला होता, मात्र.

“नारायण राणेंना शुभेच्छांसाठी फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. मी त्यांना परत नंतर फोन करेन आणि शुभेच्छा देईन,” असं राज ठाकरेंनी सागितलं.

See also  कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे सण उत्सव साधे पणाने साजरे करावे : अजित पवार