देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांना पुणे महानगरपालिके कडून घरावर कर माफ.

0

पुणे :

देशाच्या सीमा रक्षणासाठी आणि एकूणच देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकांना निवृत्तीनंतर पुणे महापालिकेच्या हद्दीतील घरावर महापालिका कोणातही कर न आकारता त्यांना सर्व सुविधा मोफत पुरविणार आहे .

याबाबत महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सांगितले कि, शहरातील माजी सैनिक, हुतात्मा पत्नी, तसेच शौर्य पदक विजेते यांचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. सर्वसामान्य करामध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव होता. मात्र हा कर पूर्णपणे माफ करण्याची उपसूचना सर्वपक्षीय सभासदांनी देत हा प्रस्ताव सभागृहात मान्य करण्यात आला आहे .

शहर हद्दीतील दहा हजारापेक्षा अधिक माजी सैनिकांना याचा फायदा होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय स्तुत्य असल्याने याविषयी अनेकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे.

See also  माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे राष्ट्रवादी काँगेस शहराध्यक्ष पदाची जबाबदारी