बाणेर येथील ताम्हाणे चौकात अतिक्रमण विभागाचे मोठी कारवाई.

0

बाणेर :

आज सकाळी अकरा च्या सुमारास बाणेर येथील ताम्हणे चौकामध्ये असणाऱ्या दुकान अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. हरित लवादाने न्यायालय ( NGT) ४९/२०१९ या कोर्ट केस नुसार ब्ल्यू लाईन मधील बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये येणारी सर्व अनधिकृत बांधकामे दुकाने कोर्टाच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पाडण्यात येत आहेत.

या वेळी महानगरपालिका अधिकारी इमारत निरिक्षक संग्राम पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, देवेंद्र पात्रे, जयवंत पवार उपस्थित होते. पालिका अधिकारी – कर्मचारीसह पोलीस आदींच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने सदर बेकायदा बांधकामे,दुकाने पाडून टाकण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण कारवाईनंतर सदर ठिकाणी व्यवसायीकांनी पुन्हा दुकाने सुरू करू नये. या ठिकाणी वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांचे नुस्कान होऊ नये यासाठी महापालिका विभागाकडून सदर ब्ल्यू लाईन मध्ये पुन्हा पत्र्याचे शेड उभे करण्यात येऊ नये असे आव्हान करण्यात आले आहे.

कारवाई करताना सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले आहे. जी अनधिकृत बांधकामे आहे ती पडण्याचे आदेश हरित लवाद अंतर्गत कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई होत असून अशा नोटिसा त्यांना अगोदर दिल्या आहेत, असे इमारत निरिक्षक व सदर कारवाई चे प्रमुख संग्राम पाटील यांनी मॅक न्यूज बोलताना सांगितले.

 

See also  हॉटेलच्या स्वच्छतागृहांमध्ये वेटरने मोबाईल वरून केले चित्रीकरण : सुतारवाडी येथील घटना.