स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा संपन्न

0

कोथरूड :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वारद फाउंडेशनच्यावतीने ऑनलाइन नृत्य स्पर्धा २०२१चे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत पाच ते दहा वर्ष वयोगटात सलोनी भरम हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पंधरा वर्षाखालील गटामध्ये आणोली धुमाळ तर 20 वर्षाखालील गटांमध्ये सलोनी वाशिवले तर 21 वर्षावरील गटांमध्ये खिराज फुलावत याने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेचे सुरज साठे यांनी ऑनलाइन परीक्षण केले. स्पर्धेचे आयोजन स्वारद फाऊंडेशनच्या संस्थापिका स्वाती शरद मोहोळ यांनी केले होते. सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र आणि पदक घर पोहोच देण्यात आले. चार गटांमधील विजेत्या स्पर्धकांना चषक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

See also  कर्नाटक येथे अपघातात जखमी गुणवान खेळाडूंना दया मदतीचा हात : माजी खेळाडूंचे आव्हान