बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तापकीर यांचे निधन.

0

बाणेर :

बाणेर गावातील सामजिक कार्यकर्ते, वृत्तपत्र विक्रेते व वसुंधरा स्वच्छता अभियान या पर्यावरण संस्थेचे संस्थापक सदस्य बाळकृष्ण गुलाबराव तापकीर यांचे (वय-५५) दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे वडील गुलाबराव तुकाराम तापकिर, पत्नी ,मुलगा, मुलगी, भाऊ ,वहिनी, नातवंडे असा परिवार आहे.

बाणेर येथील बाणेर टेकडी परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून हजारो झाडांची वृक्षारोपण करण्यात आले होते. तसेच वसुंधरा स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राम नदी स्वच्छता अभियान मध्ये देखील त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. बाणेर परिसरामधील पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये तसेच धार्मिक व सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यातून चे बरे होऊन घरी आले. नंतर त्यांना म्यूकरमायकोसिस चा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मित जाण्याने सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

See also  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एसकेपी कॅम्पस ची अजित आकांक्षा स्कॉलरशिप योजना सुरू.