भाजपचे प्रकाश बालवडकर यांच्याकडून कबड्डी पंच व नाट्य कलाकारांना सामाजिक बांधिलकीतून किराणा वाटप.

0

पुणे :
सध्या कोरोना मुळे सगळे हतबल झाले आहे. व्यवसाय थांबले खेळ क्रिडा सिनेमा नाट्य सर्व क्षेत्र बंद आहे. अशा या बिकट परिस्थीती मध्ये बऱ्याच जणांना उपासमारीची वेळ आली आहे. नाट्य क्षेत्र आणि कबड्डी have खेळ गेल्या दिड वर्षापासून पूर्णतः बंद आहे. अशा वेळी या क्षेत्रात काम करणारे नाट्य कलावंत आणि कबड्डी खेळातील महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे पंच यांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपा सहकार आघाडी चे प्रभारी प्रकाश बालवडकर यांनी कर्तव्य समजून पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे शहरातील नाट्य कलावंत आणि पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील गरजू कबड्डी पंच यांना महात्मा सोसायटी कोथरूड येथे किराणा वाटप करण्यात आला.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, करोना महामारी मुळे सर्व क्षेत्रांमधील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कोणी ना कोणी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. तेच काम प्रकाश बालवडकर सर्वांना मदत करून करत आहे. नाट्य व क्रिडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्यांची मदत करण्याचे चांगले काम करत आहेत. असेच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येण्याचे आव्हान त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

याप्रसंगी प्रकाश बालवडकर यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, नाट्य व क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्यांना काहीतरी मदत करणे गरजेचे होते. सध्या परिस्थितीची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने एक छोटीशी मदत माझ्याकडून होत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे.

या प्रसंगी नगरसेवक जयंत भावे, मंडल अध्यक्ष पुनित जोशी, प्रकाशतात्या द बालवडकर (प्रभारी-सहकार आधाडी पुणे शहर), महेश पवळे युवा मोर्चा उपाध्याक्ष पुणे शहर, संतोष लांडे मंडल उपाध्याक्ष शिवाजी नगर, मयुरी प्रणव बालवडकर, समीर पाटील, पुणे जिल्हा पंच मंडळप्रमुख संदिप पायगुडे आणि नाट्य कलावंत तसेच पंच उपस्थीत होते.

See also  छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डर उंचीबाबतच्या विषयात आठ दिवसात निर्णय : महापौर मुरलीधर मोहोळ