मुंबई बंगळूर बाह्यवळण रस्त्याला वेगाला वेसण

0

पुणे : प्रतिनिधी :-

पुणे :बाह्य़वळण मार्गावर कात्रज येथील नवीन कात्रज बोगदा ते वारजे भागातील मुठा नदीवरील पुलापर्यंत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या भागात वेगमर्यादा ८० किलोमीटर प्रतितासावरून ६० किलोमीटर प्रतितास अशी करण्यात आली आहे. मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर गंभीर अपघातांचे सत्र सुरू असतानाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांकडून वेगमर्यादेला वेसण घालण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुंताश अपघात भरधाव वेगामुळे झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

खेडशिवापूर ओलांडल्यानंतर नवीन कात्रज बोगदामार्गे पुणे तसेच मुंबईकडे जाणारी अवजड वाहने भरधाव जातात. दरी पूल ओलांडल्यानंतर सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरापर्यंत तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात घडत आहेत. या भागात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोलिसांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली.

या भागात भरधाव वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक (रम्बलर स्ट्रीप), अपघात प्रवण क्षेत्रांची माहिती देणारे फलक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर गेल्या महिन्यात गंभीर स्वरूपाचे सहा अपघात घडले.

त्यानुसार सर्वेक्षणात वेगमर्यादेला वेसण घालण्यासाठी या भागातील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी वेगमर्यादा ६० किमी प्रतितास अशी करण्यात आली आहे.

बाह्य़वळण मार्गावरील अपघात

वर्ष  अपघात  मृत्यू  गंभीर    जखमी

२०१९  १५     १६      १०      १२

२०२०  १४     १८      १५      २१

(आकडेवारी नोव्हेंबर अखेरीपर्यंतची)

See also  महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत