आमदार चंद्रकांत पाटील यांचा एक कोटी आमदार विकास निधी बाणेर येथील कोवीड रुग्णालयासाठी.

0

बाणेर :

बाणेर सर्वे नंबर 33 येथे नव्याने उभ्या राहणाऱ्या कोरोना रुग्णालयासाठी निधी कमी पडू नये म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये निधी देण्याचे ठरवले आहे. कोथरूड मतदारसंघातील बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकारणे खरेदी करण्यासाठी खर्च करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले असून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी याचा लाभ होईल यासाठी विशेष करून हा निधी दिला असल्याचे नमूद केले.

केवळ एवढेच नाही तर या निधीसह उर्वरित 3 कोटी चा विकास निधी देखील आवश्यकतेनुसार कोविड संसर्गावरील विविध उपाययोजनासाठी खर्च करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नेहमीच्या विकासकामांना फाटा देऊन यावेळेसचा निधी हा पूर्णपणे आरोग्यावर खर्च करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सर्व आमदारांना कोवीड साठी दिलेल्या निधीतून बाणेर येथील रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर, 10 मॉनिटर व अनुषंगिक साहित्य,2 एक्स रे मशीन प्रिंटर व व्युहर सह ( रेडिओग्राफी तंत्रज्ञान ) इ.सी जी मशीन, पी ए व सिसिटीव्ही व अन्य रुग्णोपयोगी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी खरेदी प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी अशी अपेक्षा ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

या सर्वांची महिती मॅक न्यूज. लाईव्ह ला देताना भाजप सहकार आघाडी चे प्रभारी प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी गरज लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी फार मोठे पाऊल उचलले आहे. कोथरूड मतदार संघात आमदार बारकाईने नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. सद्या वाढणाऱ्या कोरोना पार्श्वभूमीवर सगळ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी भर दिली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

See also  आरोग्य तपासणी मुळे रोगाचे निदान होते, रोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे जाते : लहू बालवडकर.