बालेवाडी येथील कै. बाबुराव बालवडकर मनपा शाळेत लसीकरण सुरू.

0

बालेवाडी :

दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना चे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधक उपाय योजना म्हणून लसीकरण वाढवण्याची गरज लक्षात घेऊन आज बालेवाडी येथील कै.बाबुराब बालवडकर मनपा शाळा येथे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या विशेष प्रयत्नातुन व पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्राचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी सांगितले की, कोरोना मुळे सगळ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा वेळी सगळ्यांनी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. सर्वांना लसीकरण करता यावे म्हणूनच अमोल बालवडकर यांनी प्रयत्न करुन लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे. लस सुरक्षित असल्याने पात्र नागरिकांनी आवर्जून घ्यावी.

या वेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बोलताना सांगीतले की,प्रभागातील नागरिकांना लसीकरण करणे सोयीचे व्हावे यासाठी येथे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत नागरिकांची गैरसोय दूर करणे,त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी हि माझी जबाबदारी असून त्या दृष्टीने मी काम करत आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व युवक वर्गानी देखील लसीकरण करुन घ्यावे असे अमोल बालवडकर यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, प्रभाग अध्यक्ष उमा गाडगीळ, डॉ. सागर बालवडकर, गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, सुंदर बालवडकर, योगेश बालवडकर, दादा गायकवाड, प्रविण बालवडकर, रोनक गोटे, वैभव बालवडकर, सुमित कांबळे, कृष्णा बालवडकर, शनी बालवडकर व अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते.

 

See also  बाणेर येथील ताम्हाणे चौकात अतिक्रमण विभागाचे मोठी कारवाई.