डॉ. सागर बालवडकर यांच्या प्रयत्नातून बालेवाडी येथे लसीकरण केंद्र सुरू !

0

बालेवाडी :

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात स्वतःची सुरक्षितता राखणे गरजेचे आहे म्हणूनच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या हेतूने बालेवाडी येथील उमरजी मदर अँण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटल याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या प्रयत्नातून व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या सहकार्याने कोविड – १९ लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार सुनिल टिंगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितले की,सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत त्यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड उपलब्ध न होणे अश्या अनेक समस्या निर्माण होत आहेत, या समस्यांमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रतिनिधीनी, कार्यकर्त्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, राजकारण पेक्षा समाजकारण हे सूत्र वापरण्याची आत्ता मोठया प्रमाणात गरज आहे असे आमदार सुनिल टिंगरे यांनी आपले मत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी आपले व्यक्त करताना सांगितले की, आत्ताच्या परस्थितीमध्ये अनेक राजकीय प्रतिनिधीनी नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, केवळ दिखावा करण्याची हि वेळ नसून नागरिकांना मदत करणे, त्यांची समस्या दुर करणे हे आत्ताच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी राजकीय मतभेद दुर करून जनतेच्या हितासाठी आपण सर्वजणांनी एकत्रित येऊन या आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करूयात असे मत चांदेरे यांनी मांडले .

कोरोनाची भयानक परिस्थिती पाहता लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगानेच लसीकरणाची सोय व्हावी म्हणून बालेवाडी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने मोफत लसीकरण केंद्र सुरू केले आहे. लस सुरक्षित आहे. नागरिकांनी निर्भिड पणे लस घ्यावी. याचा फायदा सर्व नागरिकांना मोठया प्रमाणात होणार आहे असे मत यावेळी डॉ. सागर बालवडकर यांनी व्यक्त केले.

See also  लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या वतीने फर्स्ट एड पॉलि-क्लिनिक नागरिकांच्या सेवेसाठी सुरू.

या लसीकरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी आमदार सुनिल टिंगरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर, माजी सरपंच गणपतराव बालवडकर , अंकुश बालवडकर, विकास कामत, नितीन मेटकर,दिलीप बालवडकर, सारंग वाबळे, डॉ. संतोष मुळे, डॉ. गणेश डमाळे, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. राजेश देशपांडे, डॉ. चिन्मय उमरजी, डॉ. सत्यवान बालवडकर, नितीन कळमकर, समीर चांदेरे, विशाल विधाते, शेखर सायकर, प्रा. रुपाली बालवडकर, मित वीज, राखी श्रीराव, प्राची सिद्दीकी, वर्षा माळी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.