गुढी उभारू निर्धाराची कोरोनावर विजयाची ! सनी निम्हण यांचा कोरोना योध्यांसाठी विशेष उपक्रम.

0

पाषाण :

गुढीपाडवा म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अरिष्टावर विजयाची पताका रोवण्याचा क्षण, यावर्षी आपण सगळेच कोरोना विरूद्ध अविरत लढाई लढत आहोत. या लढाईत फ्रंटलाईन वर आपल्या जिवाची पर्वा न करता लढताहेत ते आपले कोरोना योध्दे….डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस यांच्या निर्धाराला आणि समर्पणाला मानवंदना देण्याची आगळी वेगळी संकल्पना माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी मांडली आहे.

करोना संक्रमण काळातील अतिशय वाईट परिस्थितीत देखील सनी निम्हण यांनी एक वेगळी ओळख नागरिकांसमोर जपली आहे. या कठीण काळात नागरिकांचा आत्मविश्वास वाढवला जावा तसेच हरवलेला उत्साह परत मिळावा या हेतूने विविध कार्यक्रम निम्हण यांनी राबवले आहेत. यावेळी गुढी पाडव्याच्या निमित्ताने एक वेगळीच संकल्पना ते राबवत आहेत.

या कार्यक्रमा बाबत मॅक न्यूज ला माहिती देताना सनी निम्हण यांनी सांगितले की, मागील वर्षीप्रमाणेच यंदाही गुढीपाडवा कोरोना विषाणूच्या छायेत साजरा करावा लागत आहे. या निमित्ताने मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी गुढी उभारताना हजारो कोरोनाग्रस्तांची शुश्रूषा करणाऱ्या व त्यांच्यासाठी झटणाऱ्या ‘कोरोनायोध्यांना मानवंदना देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी. यासाठीच गुढी उभारताना कोरोनाविषक सकारात्मक संदेश लिहावा, घरातील लहान मुलांना कोरोनाग्रस्तांशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस अशांची ड्रेपरी करून या कोरोनायोध्यांना सॅल्युट करावा तसेच याचे फोटो काढून ते सार्वत्रिक करावे असे त्यांनी आव्हान केले.

यासोबतच असे फोटो आपल्या नावासह व्हॉट्सॲप नं. ८३०८१२३५५५ वर शेअर करा व माझे इन्स्टाग्राम सनी निम्हण, फेसबुक पेज सनी निम्हण ला टॅग करा,असे आव्हान सोमेश्वर फाऊंडेशनचे विश्वस्त माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे. अशा कृतीतून कोरोनाविषयक जागरूकता वाढेल व कोरोना योध्यांबद्दल कृतज्ञताही व्यक्त होईल असा उद्देश यामागे असल्याचे सनी निम्हण यांनी सांगितले.

 *चला निर्धार करू … कोरोना हद्दपार करू !*

गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोरोना योध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. सनी निम्हण यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेत सहभागी होऊयात.

See also  प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन.