प्रकाश बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन.

0

बालेवाडी :

बालेवाडी येथे पुणे सहकारआघाडीचे प्रकाश बालवडकर यांच्या वतीने एक थोर राष्ट्रीय नेते व भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह (मंत्री) अनिल माणकीकर यांचे अत्यंत उद्बोधक असे व्याख्यान संपन्न झाले.

त्यांनी आपल्या व्याख्यानात मंत्रमुग्ध करणाऱ्या वक्तृत्वातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा अवघा जीवनपटच श्रोत्यांसमोर उभा केला. डॉ. मुखर्जी यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदानाची माहिती या निमित्ताने सर्वांना मिळाली. डॉ. मुखर्जी हे एक देशप्रेमाने भारावलेले व्यक्तीमत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. डॉ. मुखर्जींबद्दल अनिलजींनी मांडलेले विचार सर्वांनाच मार्ग दाखवणारे ठरतील.

यावेळी बोलताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, देशप्रेम कसे असावे, देशासाठी लढण्याची जिद्द असणारे व्यक्तिमत्त्व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांची आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम व्याख्याना द्वारे अनिल माणकीकर यांनी सर्वांना सांगितले. त्यांचे विचार निश्चितच जीवनामध्ये खूप प्रेरणादायी ठरणार आहे. एक उत्तम प्रकारे डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांचे विविध पैलू आपणापर्यंत पोहोचविले त्याबद्दल त्यांचे आभार त्यांनी मानले.

या वेळी प्रभाग ९ बाणेर/ बालेवाडी मधील भाजप चे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पहा श्री. ज्ञानेश्वर तापकीर (प्रथम नगरसेवक बाणेर - बालेवाडी), संस्थापक अध्यक्ष योगीराज नागरी सहकारी पतसंस्था यांची चपराक महोत्सवा मधील विशेष मुलाखत.