“Covid-19 साथीच्या रोगाला टाळी व थाली बजाव नाही तर 60 वर्षाचे विज्ञानच वाचवू शकते”एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अनोखा कार्यक्रम

0

पुणे :

“राष्ट्रीय टाळी व थाळी बजावो वर्षपूर्ती” दिनानिमित्त करोना महामारी मध्ये टाळी व थाळी बजाव नाही तर covid-19 लस घेणे महत्त्वाचे आहे.याची जनजागृती करणारा कार्यक्रम मंडळाने आज आयोजित केला होता.

एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजच्या 22 मार्चला “टाळी व थाळी बजावो” वर्धापन दिनानिमित्त मागच्या वर्षी याच दिवशी देशामध्ये कोरोणा महामारी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अंधश्रद्धेच्या माध्यमातून “टाळी व थाळी” वाजवण्याचा जो कार्यक्रम घेतला त्याचा जाहीर निषेध एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला.

देशात गेले 60 वर्ष विज्ञानाला सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळे सध्या देशामध्ये चांगल्या दर्जाची विज्ञानाच्या माध्यमातून जी covid-19 ची लस तयार झाली आहे, ती देशातील जनतेने कुठल्याही खोट्या अफवेला बळी न पडता व मनात कुठलीही शंका न आणता सर्व जनतेने लस घ्यावी. स्वतःचे व देशाचे करोना महामारी पासून संरक्षण करावे व देशातील सर्व व्यवहार पूर्ववत देश पूर्वपदावर यावा यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आज सकाळी दोन तास पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाचेमहत्त्व जनजागृतीचा कार्यक्रम घेतला. तसेच जनजागृतीचे फलकही दाखविण्यात आले.

पटनाट्यमध्ये मंडळाचे प्रशांत वेलणकर, राम बाटूंगे, प्रवीण डाबी, सतिश खैरे, संतोषी बाहेती, गजानन नांगरे, सचिन कचरे, संजय मोकाशी, गणेश धोत्रे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

See also  कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे सण उत्सव साधे पणाने साजरे करावे : अजित पवार