कोल्हापूरमधील एकाच शेतकरी कुटुंबातील सहा बहिणी राज्याच्या पोलीस खात्यात.

0

कोल्हापूर :

कोल्हापूरमधील एकाच शेतकरी कुटुंबातील सहा बहिणी राज्याच्या पोलीस खात्यात कर्तव्य बजावत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील भोसले कुटुंबानं सहा मुलींना पोलीस दलात भरती करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

एकाच घरातील सहा मुली पोलीस असणारे राज्यातील हे बहुदा पहिलंच कुटुंब असावं.सारिका भोसले, सुवर्णा भोसले, सुजाता भोसले, रुपाली भोसले, सोनाली भोसले, विमल भोसले या पोलीस खात्यात सेवा बजावत आहेत. सर्व मुलींनी स्वत:ला कमी लेखू नये. आम्ही देखील शेतकऱ्याच्या मुली आहोत. शेतातील कामे करुन अभ्यास करुन पोलीस दलात भरती झालो. स्वत:ला कमी लेखू नका येणाऱ्य पोलीस भरतीची तयारी करा आणि अर्ज करा, असं आवाहन सुजाता भोसले यांनी केले आहे.

 

सुजाता सुरेश भोसले सांगतात की,आमच्या भोसले कुटुंबात आम्ही 6 जण पोलीस आहोत. 5 बहिणींचा आदर्श घेऊन पोलीस दलात येण्याचा निर्णय घेतला. रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असल्याचं सुजाता भोसले सांगतात. आज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या या सहा जणी लोकांच्या रक्षणाच व्रत जोपासत आहेत.सुवर्णा भोसले, सोनाली भोसले 2008 ला पोलीस सेवेत सुरेश भोसले यांच्या तीन मुली सारिका भोसले, सुवर्णा भोसले आणि सुजाता भोसले या तिघी पोलीस झाल्या आहेत.

त्यांचा लहान भाऊ सोमनाथ भोसले सुद्धा आता भरतीसाठी प्रयत्न करत आहे. तर, चंद्रकांत भोसले यांच्या रुपाली, सोनाली, सर्वात लहान विमल भोसले या तिघी सुद्धा पोलीस झाल्या आहेत.यामध्ये सर्वात अगोदर सुवर्णा भोसले आणि सोनाली भोसले एकाचवेळी 2008 मध्ये पोलीस खात्यात निवड झाली होती. त्यानंतर या दोघींची प्रेरणा घेत इतर चौघीही थोड्याफार अंतराने पोलीस सेवेत दाखल झाल्यात. अर्थात यासाठी त्यांना अनेक अडथळे देखील पार करावे लागले..

आजोबांचं स्वप्न या मुलींनी पूर्ण तर केलंच शिवाय परिसरातील इतर मुली आणि आणि त्यांच्या कुटुंबीयासाठी त्या प्रेरणा बनल्या आहेत . सहा नाती पोलीस दलात भरती झाल्या आणि त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या याचं त्यांच्या आजी शालाबाई भोसले आणि इतर कुटुंबीयांना विशेष अभिमान आहे.

See also  नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीची धडक कारवाई, गुप्तांगात सोने लपवून आणणाऱ्या महिलांना अटक