अलटीमेट ग्रापलिंग चॅम्पियनशिप ला सुरूवात

0

अलटीमेट फिटनेस क्लब (ULTIMATE FITNESS CLUB) चे प्रशिक्षक  गौरव कांबळे,  जेम्स थॉमस आणि संस्थापक  स्वप्नील मुरकुटे यांच्या पुढाकाराने अलटीमेट ग्रापलिंग चॅम्पियनशिप (ULTIMATE GRAPPLING CHAMPIONSHIP #OneForTheCulture) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संपुर्ण स्पर्धा ही कोरोना महामारीच्या प्रतिबंधात्मक नियमानुसार नियोजीत करण्यात आली होती.

स्पर्धेसाठी संपूर्ण देशातील ३० मुख्य स्पर्धकांना सहभागी करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन मा. शिवलाल (नाना) धनकुडे ( संस्थापक अध्यक्ष श्री भैरवनाथ शिक्षण संस्था ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या वतीने केदार कदम (पत्रकार प्रतिनिधी) यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व स्पर्धकांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीतील लढत ही सुमित(Team Relentless, मुंबई) आणि मोहित ( Warriors Cove MMA, दिल्ली) या दोघांमध्ये झाली. अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये सुमित विजेता ठरला.

उपस्थित सुरेश कांबळे (मा. पैलवान), सी. ए. तांबोळी ( सदस्य, WAKO Asia आणि अध्यक्ष, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन ), विराज धनकुडे ( सचिव, आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुल & ज्युनियर कॉलेज), सुरेश मुरकुटे(मा कामगार नेते, ५१२ आर्मी बेस वर्कशॉप), नारायण गव्हाणे ( सामाजिक कार्यकर्ते ) आणि प्रियांका मुरकुटे (अध्यक्षा UFC क्लब) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके आणि स्पर्धेच्या मुख्य विजेता सुमित याला २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

See also  पाषाण येथे कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनच्या वतीने विविध सोसायट्यांना सॅनिटायझर ची फवारणी...