तपासासाठी अनिल भोसले यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

0

पुणे :

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी  राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले  यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक केली आहे.

ईडीने गुन्हा दाखल

बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना (25 फेब्रुवारी) अटक केली होती. सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात. यानंतर आता शिवाजीराव भोसले बँकेतील या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सध्या ईडीकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. या तपासासाठी अनिल भोसले यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात येणार आहे.

भोसले यांना अटक करण्याची शक्यता

याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कोर्टातून भोसले यांचा ताबा घेण्यासाठी ऑर्डर काढण्यात आली आहे. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पुणे येथे रवाना झालं आहे. त्यामुळे लवकरच अनिल भोसले यांना अटक केली जाणार आहे.

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर  शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित बहु-स्तरीय उड्डाणपुलाच्या बांधकामाला दिवाळी नंतर सुरू होणार : अजित पवार