जीएसटी चोरीचे रॅकेट उघड; एकाला अटक 

0

पुणे :

कोणत्याही मालाची खरेदी किंवा विक्री न करता सुमारे 32 कोटी रुपयांची बनावट ‘जीएसटी बिले’ बनवून ५ कोटींपेक्षाही जास्त जीएसटी चुकविणाऱ्या पुणे येथील मे. जगदंबा एंटरप्राइझच्या संचालकास पुणे-२ सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

सदर कंपनीने दिल्लीस्थित बनावट कंपन्यांकडून मालाची सुमारे 32 कोटी रुपयांची बिले मिळविली. त्या बिलांच्या आधारे सुमारे ५.६ कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट वापरून तयार मालाची बनावट बिले तयार केली.

या संपूर्ण व्यवहारामध्ये कोठेही मालाची खरेदी विक्री न झाल्याने सुमारे ५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त जीएसटी बुडविला गेला. पुणे-२ सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने याची दखल घेऊन कंपनीवर छापा टाकला आणि संचालक नरेश बन्सल याची चौकशी केली. चौकशीमध्ये बन्सन याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.

त्याआधारे त्यास अटक करुन ०२ मार्च रोजी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणात पुढील तपास चालू असून संपूर्ण आर्थिक व्यवहारांची शहानिशा केली जात आहे अशी माहिती पुणे-२ सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाच्या ‘हेडक्वार्टर्स प्रिव्हेंटिव्ह युनिट ‘ चे उप-आयुक्त सचिन घागरे यांनी दिली.

See also  पुणे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचवले.