पाषाण येथे संत नरहरीमहाराज सोनार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0

पाषाण :

पाषाण मध्ये संत नरहरीमहाराज सोनार यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन  करण्यात आले. स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांच्या संपर्क कार्यालयात संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी परिसरातील भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय सुपेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी कुलथे, कोथरुड भाजपा उपाध्यक्ष उत्तम जाधव, विराज कोकाटे प्रदिप खोडं, नंदू जाधव, सोमनाथ सुपेकर, अनिल उदांवत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सचिन पाषाणकर म्हणाले, संत नरहरी महाराज सोनार यांच्या विचारातून समाजाचं अध्यात्मिक जीवन समृद्ध होत आहे. संतांचे विचार हे नेहमीच सर्वच समाजाला मार्गदर्शक राहिले आहे. यामुळे संतांचे स्मरण करणे आवश्यक आहे. यावेळी संत नरहरी सोनार यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी पूजन केले व अभिवादन केले.

See also  लसीकरण केंद्र वाढले पण लस कुठे आहे, नागरीकांचा लस केंद्रावर सवाल...