पाषाण येथे ई – कचरा आणि प्लास्टिक कचरा संकलन.

0

पाषाण :

पुणे महानगरपालिका तसेच जनवाणी संस्था, आणि स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांच्यावतीने आज दि.२१ फेब्रुवारी रोजी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी पंचवटी परिसरामध्ये विविध ठिकाणी ई कचरा आणि प्लास्टीक कचरा संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वरदायिनी सोसायटी, दत्तमंदिर, पाषाण बाणेर लिंक रोड, पंचवटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला.

या उपक्रमाबाबत सचिन पाषाणकर सांगतात की,शहरांमध्ये घनकचरा उचलण्याची सोय सर्वच शहरांमध्ये आहे, परंतु ई-वेस्टबाबत फारशी जागरूकता दिसत नाही. फ्रीज, टीव्ही, संगणकासारख्या इलेक्‍ट्रॉनिक्स उपकरणांत पारा, शिसे, कॅडमियम, क्रीमियम अशी विषारी रसायने आणि पॉलिब्रॉमिनिटेड बायफेनाईल यासारखी अग्निरोधके घटक असतात. ते घटक बाहेर पडल्यास प्रदूषण वाढते. शिवाय त्या वस्तूंचा स्फोट झाला तरी जीवितहानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

शहरात ई-वेस्ट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या वस्तूंची विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. तसेच रस्तोरस्ती प्लास्टिक पडल्याने शहर गलिच्छ दिसते. ते प्लास्टिक जनावरे खातात आणि जीवाला मुकतात. म्हणूनच पुणे महानगरपालिका तसेच जनवाणी संस्था, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांच्यावतीने ई – कचरा व प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आला. त्यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

See also  घड्याळाशी बांधिलकी असल्याने जे सोबत येतील त्यांना समावेश करुन घेवू : बाबुराव चांदेरे