मंत्री झाकिर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला.

0

कोलकाता :

पश्चिम बंगालचे मंत्री झाकिर हुसैन यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर बॉम्ब फेकला. हल्ल्यात झाकिर हुसैन गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  मुशिर्दाबाद जिल्ह्यातील रघुनाथगंज परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

कोलकात्यात तृणमुल काँग्रेसची बैठक होती आणि बैठकीसाठी झाकिर हुसैन रवाना झाले होते. निमतिता स्टेशनच्या दिशेनं जात असताना त्यांच्या कारवर बॉम्ब हल्ला करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ जंगीपूर महकमा स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना कोलकात्यात नेलं जाणार आहे.

झाकिर यांच्यासोबत असलेले तृणमुल काँग्रेसचे काही कार्यकर्तेदेखील जखमी झाले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

See also  म्युकरमायकोसीसचे रुग्ण फ़क़्त भारतातच मोठ्या प्रमाणात का सापडत आहे ?