मुंबई :
सध्या करोना विषाणू जगभरात आहे. मात्र, त्याचवेळी भारतात करोनासह काळ्या बुरशीचे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळेच अनेकांना प्रश्न पडला आहे की, जर जगभरात करोना विषाणूचे रुग्ण आहेत तर, मग म्युकरमायकोसीसचे रुग्ण फ़क़्त भारतातच मोठ्या प्रमाणातका सापडत आहेत. यावर संशोधक काम करीत आहेत. मात्र, प्रथमदर्शनी कमी मुद्दे असे आहेत की, ज्यामुळे भारतात काळ्या बुरशीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे रूग्णालयात मोठ्या संख्येने रूग्णांना ऑक्सिजन व बेडची कमतरता भासली आहे. परंतु गेल्या काही दिवसांत देशातील अनेकांना काळ्या बुरशीच्या संसर्गामुळेही आपले डोळे गमवावे लागले आहेत. कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या अनेकांना धोकादायक संसर्गाची बाधा होत आहे. परिणामी अनेक रूग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. एखाद्या रुग्णालयात वर्षात एक किंवा दोन रुग्ण सापडणाऱ्या काळ्या बुरशी रुग्ण सध्या खूप सापडत आहेत. करोनातून बरे झाल्यावर तसेच कोंदट वातावरणातील घरात किंवा जागेवर राहणाऱ्या अनेकांना या बुरशीची लागण झालेली आहे.
भारतात काळ्या बुरशीचे रुग्ण प्रमाण जास्त होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण. मधुमेहाचे सुमारे सात कोटी रुग्ण येथे आहेत. यापैकी बर्याच जणांना कोरोना इन्फेक्शन झाल्यावर स्टिरॉइड्स द्याव्या लागतात. ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. अशा रुग्णांना काळ्या बुरशीच्या संसर्गाचा धोका असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तसेच इतर अनेकांमध्ये इम्युनिटी पॉवर कमी झाल्याने या बुरशीची लागण झाल्याचा अंदाज तज्ञांचा आहे. मात्र, यावर आणखी संशोधन केल्यावरच खऱ्या अर्थाने नेमके कारण स्पष्ट होईल.