बाणेर तुकाई टेकडीवर चारशे मशाली लागणार आहेत : अभिनेते सयाजी शिंदे

0

बाणेर :

वसुंधरा अभियान बाणेर व सह्याद्री देवराई यांच्या माध्यमातून वृक्षदींडी आणि ४०० झाडांचे वृक्षरोपण करण्याचा कार्यक्रम वसुंधरा अभियान मुक्त व्यासपीठ तुकाई टेकडी बाणेर येथे घेण्यात आला, हा कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते, सह्याद्री देवराई च्या माध्यमातून महाराष्ट्रात हरित क्रांती पूढे नेणारे सयाजी शिंदे,  लेखक-दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्या ऊपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

टेकडीवर नव्याने बांधलेल्या टाकी क्र. 29 – सावित्री, चे ऊदघाटन प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसुंधरा अभियान बाणेर चे बहुसंख्य कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते.

या प्रसंगी बोलताना सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की, ३९१ शिवजयंती निमित्त ४०० झाडांचा वृक्षारोपण म्हणजे ४०० मशाली लागणार आहे. येते हिरवा वणवा लागणार आहे. वसुंधरा अभियान बाणेर अतिशय मोलाचे काम केले आहे. असेच अनेक ग्रुप पुढें यायला हवे.

तसेच सुप्रसिद्ध कवी अरविंद जगताप यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करताना सांगीतले की, वसुंधरा अभियान हेवा वाटावा असे काम करत आहे. टेकड्या जिवंत करण्याचे काम कार्यकर्ते जोमाने करत आहे.

पहा व्हिडिओ वृक्षदिंडी व काय म्हणाले सयाजी शिंदे :

See also  शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिला खुलासा