शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिला खुलासा

0

पुणे :

पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे च्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत सिंथेटिक ट्रॅकवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या बरोबरच्या मंत्र्यांच्या गाड्या चालविल्या गेल्या. या बद्दल राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खुलासा पाठविला आहे.

बालेवाडी म्हाळुंगेच्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत क्रीडा विद्यापीठासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह क्रीडा मंत्री सुनील केदार, इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीसाठी आलेल्या या नेत्यांच्या गाड्या थेट क्रीडानगरीमधल्या अॅथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवरून चालवल्या गेल्या.

त्यावरच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने पुणे जिल्हा माहिती कार्यालयाकडे खुलासा पाठवण्यात आला आहे. यात ते म्हणतात, की आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी वाहने क्रीडा संकुलातील ट्रॅकवर पाहणीसाठी आली होती. ऍथलेटिक्स ट्रॅक शेजारी असलेल्या सिमेंट क्रॉक्रिंटवरून प्रमुख मान्यवरांची एकच गाडी जाण्याचे नियोजन करण्यात आले होतं. मात्र काही गाड्या अचानक सिंथेटिक ट्रॅकवर गेल्याने दिलगिरी व्यक्त करत आहोत.

असा खुलासा करणारे पत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. यापुढे अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर वाहने जाणार नाही याबाबत योग्य दखल घेतली जाईल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

See also  पाषाण येथे अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी झालेल्या मोफत लसीकरण मोहीमेस उत्स्फूर्त प्रतिसाद.