राज्यपालांनी आता अंत पाहू नये : अजित पवार

0

मुंबई:

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जागांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मान्यता न दिल्यानं सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  या अस्वस्थतेला आखेर वाट करून दिली. ‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

राज्यपाल हे महत्त्वाच्या पदावर बसलेले आहेत. त्यांनी आता याबाबतीत अंत पाहू नये. लवकरात लवकर निर्णय घ्यावा,’ असं अजित पवार म्हणाले. ‘विधान परिषदेसाठी नावांची शिफारस करताना महाविकास आघाडी सरकानं सगळे नियम, अटी पाळल्या आहेत. मंत्रिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सहीनं १२ नावांचं पत्र लिहिलं आहे. पूर्ण बहुमत आहे. सभागृहात १७१ आमदारांचं बहुमत सिद्ध झालंय. एवढं सगळं असतानाही ज्यांनी अंतिम निर्णय घ्यायचा, ते सही करत नाही, याबद्दल अजितदादांनी आश्चर्य व्यक्त केलं.

आता आम्हाला कधीतरी त्यांना भेटावं लागेल. किती वेळ थांबायचं हे विचारावं लागेल. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहेच ना,’ असंही ते म्हणाले.

See also  अण्णा आंदोलनावर ठाम : फडणवीसांची चर्चा निष्फळ