“ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे :

कशीष प्रॉडक्शन्स आणि पुणेकर प्रतू फौंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना “ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया” पावर्ड बाय चंदुकाका सराफ अँड सन्स ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा दिमाखदार सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल्स, क्रीडा अश्या अनेक व्यक्तींना गौरवण्यात आले.

या सोहळ्याचे आयोजक दिग्दर्शक व अभिनेते योगेश पवार होते, तर कार्यक्रमच्या संचालिका पूजा वाघ या होत्या आणि मार्केटिंग, पी.आर-मार्केटिंगची जवाबदारी प्रतीक शुक्ल यांनी पार पाडली.

कार्यक्रमात अनेक दिग्गजाचा सत्कार करण्यात आला यात पीसीपीसी चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सेवावृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे, नीलम जाधव, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर, प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, अभिनेते आस्ताद काळे, अभिनेते संग्राम साळवी, अभिनेत्री मीरा जोशी, अभिनेत्री माधुरी पवार, आर जे बंड्या, आर जे शोनाली, आदित्य डेंटल हॉस्पिटलचे डॉ आदित्य पतकराव, अभिनेत्री सायली पराडकर, अभिनेत्री सिद्धी पाटणे, अभिनेत्री मयुरी विसपुते, ब्लाइंड इंटरनॅशनल क्रिकेटर अमोल करचे, सामाजिक कार्यकर्त्या अनुशा अय्यर, मॉडेल रुपाली सावंत, राधिका कुलकर्णी, विनया डोंगरे, उमेश पवार, कृष्णा देशमुख.
याशिवाय अनेक आपापल्या व्यवसायातील उदयोन्मुख व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.

या वितरण सोहळ्याबद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात नाव कमावणे सोपे नसते. यासाठी अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करावे लागते त्यासाठी या प्रसिद्ध व्यक्तींपासून इतरांना प्रेरणा मिळावी हाच या सोहळ्यामागचा हेतू आहे”
कार्यक्रम संचालिका पूजा वाघ म्हणाल्या,’लॉकडाऊन नंतरचा आणि २०२१ चा हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. २०२० मधील सर्व नकारात्मकता मागे सारून २०२१ मध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडतील अशी आशा करून या पुरस्कारामुळे नव्या उमेदीने कामाला लागूयात.”

पुणेकर प्रतू फौंडेशनचे अध्यक्ष प्रतिक शुक्ल म्हणाले,’ आम्हाला या पुरस्कार सोहळ्याचा भाग होता आल्याबद्दल अभिमान आहे. कशीष प्रॉडक्शन्स हे एक प्रसिध्द नाव आहे. यापुढे पुणेकर प्रतू फाऊंडेशन आणि कशिश प्रॉडक्शन्स ह्यांच्या वतीने समाजात संयुक्त रित्या सामाजिक कामे करण्यात येणार आहे.

See also  विना परवाना गावठी पिस्तल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला सापळा रचून पकडले : सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई !