करोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बजेट कोसळले.

0

पुणे :

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यातच विद्यापीठाकडील ६०० कोटींच्या ठेवी ३०० कोटींपर्यंत कमी झाल्याचे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे एकूणच करोनामुळे विद्यापीठाची आर्थिक घडी विस्कटल्याचे स्पष्ट होत आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात विद्यापीठाच्या ठेवी निम्म्याने घटल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाला आता यापुढील काळात खर्चात काटकसर करावी. उत्पन्न वाढीसाठी नवीन स्त्रोत तयार करावेत, अशा सूचना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी दिल्या.

दरम्यान, विद्यापीठाचे उत्पन्न घटल्याने यापुढे संलग्न महाविद्यालयांच्या विकास कामांच्या खर्चांना कात्री लावावी. मात्र, विद्यार्थी हितासाठी आणि संशोधनासाठी निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, ही बाब व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तथापि, विद्यापीठाच्या उत्पन्नात घट होत असून, खर्च वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या विकास कामांना कात्री लागणार असल्याचे दिसून येत आहे.

See also  राज ठाकरे यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांना एकला चलो रे चा नारा