शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहू : न्यायमुर्ती कोळसे पाटील

0

पुणे :

जात, पंथ, धर्म, नेता आपले शोषण करत आहेत. या व्यवस्थेला मोडले पाहिजे. मनुवादाला संपवले पाहिजे. पण तीच दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे. आपले नेता आपल्याला पुढे येऊ देत नाहीत. मी पोलीस, मरणाला घाबरत नाही. कितीतरी मोदी येतील अन् जातील पण ‘मनु’वाद आणि ‘मनी’वादाला घाबरणार नाही. आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहू, असे मत निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

पुण्यात स्वारगेट गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कोळसे पाटील म्हणाले, आपण मालक होऊ शकत नाही कारण आपण संघटित नाही..ही नवी पेशवाई काय आहे? असा प्रश्न मला विचारला जातो.. ‘ते’ बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता असा पुनरुच्चार कोळसे पाटील यांनी केला. आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम मुश्रीफ म्हणाले, एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे आव्हान कुणाला आहे याबाबत स्पष्टता हवी आहे. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला कधी गांभीर्याने घेतले नाही. ब्राह्मणवादावर टीका केली तर गुन्हा दाखल होत असेल तर महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा.कारण त्यांनी कायम ब्राह्मणवादाविरोधात लढा दिला.

“कवी, विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. अशा दहशतीच्या काळात आपल्या भक्कमपणे उभे रहायचे आहे. ब्राह्मणवाद, भांडवलशाही, मुस्लिमांवर अत्याचार याचे मूळ पुरुषसत्ताक विचारांमध्ये आहे. या द्वेषाच्या विरोधात आपल्याला प्रेमाची लढाई करायची आहे, असे आवाहन लेखिका अरुंधती राॅय यांनी केले. भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘एल्गार’ परिषदेत अरुंधती राॅय बोलत होत्या. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, आबिदा तडवी, आयशा रेन्नारेन्ना आदी यावेळी उपस्थित होते.

See also  कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करणाऱ्यांना अटक

आजच्या काळात भाषण करताना प्रत्येक अर्धविराम, पूर्णविरामाला पोलिस गुन्हा दाखल करतात, त्यामुळे खूप जपून बोलावे लागते असे म्हणत अरुंधती राॅय यांनी भाषणाला सुरूवात केली. राॅय म्हणाल्या, “तीन कृषी कायदे रद्द करा म्हणून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर दोन महिने आंदोलन सुरू आहे, पण आता आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या सोबत भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे.

आपल्या ज्या कार्यकर्त्यांना अटक केले आहे, ते निर्दोष आहेत. पण आपल्या देशात जात, धर्म, राजकीय पक्ष याचा विचार करून कारवाई होतो. त्यामुळे कवी, विद्यार्थी जेलमध्ये आहेत, पण लोकांची हत्या करणारे बाहेर मोकाट फिरत आहेत. न्यायालयाकडूनही जात, पंत, लिंग पाहूनच न्याय दिला जात आहे.

सुधीर ढवळेंच्या पत्राचे वाचन

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक असलेले सुधीर ढवळे यांनी जेलमधून लिहिलेले पत्र एल्गार परिषदेत वाचन करून दाखविण्यात आले. यामध्ये त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवर टीका केली. दरम्यान, एल्गार परिषदेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता, वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी नजर ठेवून होते. एल्गार परिषदेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर व्हिडिओ शुटींगही केली आहे.