मुसळधार पावसामुळे सुस महादेव नगर रस्त्याला आले नदीचे  स्वरूप…

0

सूस :

रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सुसगाव परिसरातील महादेव नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले व या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.

सुसगाव परिसरामध्ये बुधवार रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने महादेव नगर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी वाहत आहे. रस्त्यांवर ओढ्याचे सारखे पाणी येत असल्याने या परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला असून, महादेव नगर परिसरातील नागरिक प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील मागील तीन वर्षापासून सुस महादेव नगर परिसरातील हा रोड अद्याप झाला नाही. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून सर्व प्रकार वापरून लवकरात लवकर हा रोड करण्यात यावा अशी मागणी ऋषिकेश कानवटे यांनी केली आहे.

See also  नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी राबविले प्रभागातील सोसायट्यांसाठी MNGL च्या अधिकारी वर्गासोबत समस्यांवर चर्चासत्र...