पुणेकरांच्या ताफ्यात एकूण 20 डबलडेकर बस येणार, पुणेकरांचा प्रवास सुखदायक होणार

0

पुणे :

डबलडेकर बस खरेदी करण्याच्या पीएमपीच्या प्रक्रियेला अखेर दीड वर्षाच्या कालावधीनंतर मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यापासून निविदाप्रक्रीया सुरू होईल. 20 डबलडेकरसह 100 ई-बसची खरेदी करण्यात येईल,असे समजते.डिसेंबर 2022 मध्ये ओमप्रकाश बकोरिया अध्यक्ष असताना बसखरेदीचा निर्णय झाला होता. त्यास संचालक मंडळाने देखील मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर सारे ठप्प झाले. बस प्रत्यक्ष धावण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पुणे शहरात मागील काही वर्षापासून होणारी प्रवाशांची गर्दि लक्षात घेऊन डबलडेकर बस सेवा सुरु करायचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्यात 20 बस घेतल्या जातील. या बस बीआरटी’ मार्गावरून धावणार नाहीत.

प्रति किमीसाठी सहा रुपये लागणार

इलेक्ट्रिक बस एक किलोमीटर धावण्यासाठी अवघे सहा रुपये खर्च येतो. मात्र ठेकेदाराच्या बसला प्रतिकिमीसाठी ५० ते ६० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने स्वतः च्या मालकीच्या बस खरेदीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमपी बॅकांकडून कर्ज घेणार आहे. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडूनही आर्थिक साहाय्यही घेण्यात येईल.

*नवी डबलडेकरची वैशिष्ट्ये*

नव्या बसला दोन जिने(जुन्या बसला एकच जिना) वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक उत्तम सस्पेशन डिजिटल तिकिटाची बसमध्येच सुविधा बसचा ‘लुक लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा प्रवासी क्षमता जास्त आसन – 70 पर्यंत, (40 उभे राहून प्रवास करू शकतात,तर 30 बसून) एकाच वेळी किमान शंभरपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे जास्त बसची अथवा फेऱ्याची गरज भासणार नाही बसची उंची: 14 फूट 4 इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचा अडसर येणार नाही.

पूर्वी पीएमपीच्या ताप्यात ‘एसएलएफ प्रकारची डबलडेकर बस होती, जिच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च जास्त होता नवी इलेक्ट्रिक असल्याने देखभालीचा खर्च कमी असणार एका बसची किंमत : 2 कोटी.

*पीएमपीची वाटचाल*

एकूण बस संख्या: 1650

रोजचे प्रवासी : 12 लाख (सरासरी)

प्रवासी उत्पन्न: 1.50 कोटी (जवळपास)

See also  भाजपने दाखल केलेल्या याचिकेचा खर्च महापालिकेवर, ठराव विरोधात शिवसेनेचे पुण्यात आज भीक मांगो आंदोलन !

रोजचा प्रवास : 3 लाख 60 हजार किमी.

एकूण मार्ग: 370

एकूण बस थांबे (शहरात) : 4300

पीएमपी स्वःताच्या मालकीच्या एकूण 100 इलेक्टिक बस घेणार असून यात 20 डबलडेकर असतील. पुढील आठवड्यापासून निविदा प्रक्रियेला सुरवात होणार असून या प्रक्रियेसाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी म्हटले आहे.