भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील दुर्घटनेनंतर पुण्याजवळील प्रसिद्ध धबधबे पर्यटकांसाठीं बंद

0

पुणे :

गेल्या दोन दिवसांत लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पाच आणि ताम्हिणी घाटातील एका धबधब्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या पार्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार पुर्ण जिल्ह्यातील अनेक धबधबे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत.

पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे मागील दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे लोणावळा आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावले उचलली आहेत. तसेच, भीमाशंकर अभयारण्यातील सर्व निसर्गवाटासुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

*तळेगाव : भुशी धरणावरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर कुंडमळा येथे पोलिसांकडून खबरदारी*

स्थानिक प्रशासनाच्या या निर्णयामुळे विकेंडला वर्षाविहाराची मजा लुटण्यासाठी पुणे परिसरातील धबधबे आणि पर्यटनस्थळी गर्दीं करणाऱ्या पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आवळू शकतो.

*खालील पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत.*

* भीमाशंकर येथील धबधबे तसेच चोंडीचा धबधबा पर्यटकांसाठी बंद

*कोंढवळ धबधब्याकडे जाणारे सर्व मार्ग बंद

* खांडस ते भीमाशंकर मार्ग प्रवासासाठी बंद

*लोणावळ्यात पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर संचारबंदी

*शिडी घाट पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद

See also  आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील